जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने अंतिम सामन्यात चीनचा २३८-२३४ असा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिता तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप या त्रिकुटाने विश्वविक्रमाची बरोबरी केली. उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियावर २३४-२३३ असा निसटता विजय मिळवला होता. हे भारताचे या स्पर्धेतील सातवे सुवर्णपदक असून एकूण पदकसंख्या ५३ झाली आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाला सुवर्ण
Source: Prahaar