मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स व आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देण्यासाठी महापालिकेने पाऊल उचलले आहे. आयआयटी मुंबई येथे ५० शिक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा झाला, जिथे ड्रोन, अल्फाबॉट लाइन फॉलोइंग व लॅब-इन-अ-बॉक्सचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. आयुक्त आश्विनी भिडे व अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.
महापालिका शाळांमध्ये रोबोटिक्स शिक्षणाला सुरुवात
Source: Prahaar