पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनुसार महाराष्ट्रात नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे पेपर फुटीच्या खटल्यांसाठी दोन फास्ट ट्रॅक न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली ही न्यायालये 'सार्वजनिक परीक्षा (अनफेअर मीन्स प्रतिबंधक) कायदा, २०२४' अंतर्गत प्रकरणांची सुनावणी घेतील व तीन महिन्यांत निर्णय देणे बंधनकारक आहे. न्यायाधीश एस. व्ही. पवार व गुलशन कोलते यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पेपर फुटी खटल्यांसाठी महाराष्ट्रात दोन फास्ट ट्रॅक कोर्ट
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies