नाशिक जिल्ह्यात अन्न प्रशासनाची मोठी कारवाई

नाशिक जिल्ह्यात अन्न प्रशासनाची मोठी कारवाई

नाशिक जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाने मालेगाव, आडगाव व जुने नाशिक येथे छापे टाकून लाखो रुपयांचा संशयित व प्रतिबंधित अन्नसाठा जप्त केला. मालेगावातील श्रीराम एंटरप्रायझेसमधून १७ लाख २७ हजार रुपयांचे सोयाबीन तेल, तर आडगावातील स्वागतम स्वीट्समधून भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आले. जुने नाशिकमधील भारत जनरल स्टोअर सील करून गुन्हा दाखल करण्यात आला. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली असून व्यावसायिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies