महायुतीत महामंडळ नियुक्तीचा तिढा

महायुतीत महामंडळ नियुक्तीचा तिढा

महायुती सरकारला दीड वर्ष पूर्ण झाले तरी राज्यातील महामंडळांवरील अध्यक्ष व संचालक नियुक्त्या रखडल्या आहेत. भाजप, शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यात वाटपाच्या फॉर्म्युल्यावर एकमत नसल्याने हा तिढा निर्माण झाला आहे. प्रस्तावित 49-28-23 टक्के वाटपाला राष्ट्रवादीने 27 टक्क्यांची मागणी करून विरोध केला आहे. तिन्ही पक्षांतर्गतही इच्छुकांची संख्या मोठी असल्याने यादी अद्याप अंतिम झालेली नाही. यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढत आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies