भारतीय हवामान विभागाने देशातील १७ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गंगेच्या मैदानी भागात वरच्या हवेचे चक्राकार वारे सक्रिय असून दक्षिण-पूर्व राजस्थानमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पुढील २४ ते ४८ तासांत ताशी ७० ते ८५ किमी वेगाने वारे वाहू शकतात. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि काही भागांत गारपीटीची शक्यता आहे. डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रासह १७ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies