जरांगेंचा जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

जरांगेंचा जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या विद्यार्थी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. पेपर फुटी आणि शैक्षणिक मागण्यांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस लाठीचार्जचा त्यांनी निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः किंवा प्रतिनिधी पाठवून विद्यार्थ्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच बड्या उद्योगपतींचे कर्ज माफ करणाऱ्या सरकारने शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा नैतिकतेने मान्य करावा, अशी मागणी केली.

Source: Mumbai Tak

Read the live feed on ZapIndies