आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा; रुग्णाला सोलापूरला हलवले

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा; रुग्णाला सोलापूरला हलवले

आषाढी वारीच्या इतिहासात प्रथमच एअर ॲम्ब्युलन्सचा वापर करून छत्रपती संभाजीनगर येथील बाळू आसाराम पडूळ (वय ५४) यांना पंढरपूरहून सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. छातीत त्रास जाणवल्यानंतर प्राथमिक उपचार करून त्यांना हवाई मार्गे नेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विमानतळावर रुग्णाची भेट घेऊन वैद्यकीय सुविधांची खातरजमा केली. लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी राज्य शासनाने ही सेवा सुरू केली आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies