राज्यातील ३ हजार २९ धरणांमध्ये सध्या ५३.३८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला असला तरी मराठवाड्यात अपेक्षित पाऊस नसल्याने तेथील धरणांमध्ये केवळ २५.४४ टक्के साठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून उशिरा आल्याने एकूण साठ्यात १० टक्क्यांची घट झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये ८३.६८ टक्के साठा नोंदवण्यात आला आहे.
राज्यातील निम्म्याहून अधिक धरणे भरली, पाणीसाठा ५३.३८ टक्के
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies