राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मान्सून सक्रिय झाल्याने कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर गोंदिया जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला वेग आला आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies