अनाहत सिंगची जागतिक ज्युनियर स्क्वॅश विजेतेपदावर ऐतिहासिक मोहर

अनाहत सिंगची जागतिक ज्युनियर स्क्वॅश विजेतेपदावर ऐतिहासिक मोहर

कॅनडातील नायगारा-ऑन-द-लेक येथे झालेल्या २०२६ जागतिक स्क्वॅश ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या अनाहत सिंगने मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. अव्वल मानांकित अनाहतने अंतिम सामन्यात इजिप्तच्या द्वितीय मानांकित रुकाया सालेमचा ३-० असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयासह ती ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन बनणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. अनाहतच्या या कामगिरीने इजिप्तचे २०११ पासूनचे ज्युनियर मुलींच्या जागतिक विजेतेपदावरील वर्चस्व संपुष्टात आले.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies