धारावी प्रकल्पासाठी मुलुंड डंपिंग ग्राऊंडची १५ एकर जमीन भाडेपट्ट्याने

धारावी प्रकल्पासाठी मुलुंड डंपिंग ग्राऊंडची १५ एकर जमीन भाडेपट्ट्याने

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी मुलुंड डंपिंग ग्राऊंड येथील १५ एकर जमीन ५ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि. यांनी ही जागा कास्टिंग यार्ड, प्रीकास्ट घटक निर्मिती व आरएमसी प्लांटसाठी मागितली आहे. या करारातून महापालिकेला १०३.४७ कोटी रुपये महसूल अपेक्षित असून, जागेवरील २.५ ते ३ लाख मेट्रिक टन कचरा हटविण्यासाठी २० कोटी रुपये खर्च येईल. निव्वळ महसूल ८३.४४ कोटी रुपये राहील.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies