विमानतळ हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

विमानतळ हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

मुंबईतील विमानतळ परिसरातील एका हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. पीडित महिला आणि आरोपी यांची पूर्वीपासून ओळख होती. २२ जुलै रोजी हॉटेलच्या खोलीत ही घटना घडली. पोलिसांनी २४ जुलै रोजी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून, त्याला २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies