गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूचा प्रादुर्भाव, तीन मुलांचा मृत्यू

गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूचा प्रादुर्भाव, तीन मुलांचा मृत्यू

गुजरातमध्ये चांदीपुरा विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. आतापर्यंत सात मुलांना लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. हा विषाणू सँड फ्लाय (वाळू माशी) चावल्यामुळे पसरतो. मुख्यतः १५ वर्षांखालील मुलांना तीव्र ताप, उलट्या आणि मेंदूज्वराची लक्षणे दिसतात. आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी माहिती दिली. अनेक गावांमध्ये मुलांना डॉक्टरांकडे न नेता बुवांकडे नेल्याने उपचाराला उशीर होत आहे.

Source: BBC Marathi

Read the live feed on ZapIndies