नाशिकमध्ये संततधार पाऊस; गोदावरी पूर्वपदावर

नाशिकमध्ये संततधार पाऊस; गोदावरी पूर्वपदावर

नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असून अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून ४,९९७ क्युसेक, दारणा धरणातून १३,२५० क्युसेक तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे ४३,०६८ क्युसेक पाणी सोडले जात आहे. यामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी कमी होत असून नदी पूर्वपदावर येत आहे. जिल्ह्यातील धरणांचा एकूण पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies