बीडच्या ९ वर्षीय अनुजाची इस्रो सहलीसाठी निवड

बीडच्या ९ वर्षीय अनुजाची इस्रो सहलीसाठी निवड

बीड जिल्ह्यातील जि.प. शाळेची ९ वर्षीय विद्यार्थिनी अनुजा हावळे हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सहलीसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय बीटीएस परीक्षेत तिने दुसरा क्रमांक मिळवून ही संधी मिळवली. तिचा हा पहिला विमान प्रवास असून, तिला इस्रोतील वैज्ञानिक कामकाज पाहण्याची उत्सुकता आहे. तिच्या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies