प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातील 'पाऊस पकडा' (कॅच द रेन) अभियानाचा उल्लेख केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात असून, त्यात जलयुक्त शिवार २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण, भूजल पुनर्भरण यांसारखे उपक्रम समाविष्ट आहेत. यापूर्वी प्रसाद यांना जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय वेबिनारमध्ये वक्ते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.
नाशिकच्या जलसंवर्धन उपक्रमाची मन की बातमध्ये दखल
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies