मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उच्चक्षमता सामूहिक वाहतूक मार्ग (एचसीएमटीआर), अंतर्गत रिंग रोड व तीन बोगदे या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. ४३.६ किमीचा एचसीएमटीआर प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यामुळे २५ ते ३० टक्के वाहतूक कमी होणार आहे. ८३.१२ किमीच्या अंतर्गत रिंग रोडचे पाच टप्प्यात काम होणार आहे. भोसरी-उंड्री, रामनदी-भूगाव ते राजाराम पूल व तळजाई टेकडी ते पद्मावती-हिंगणे येथे बोगदे बांधले जाणार आहेत.
पुण्याच्या वाहतूक कोंडीवर तीन प्रकल्पांवर शिक्कामोर्तब
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies