लाडकी बहीण योजना सुरूच, ई-केवायसी पुन्हा सुरू

लाडकी बहीण योजना सुरूच, ई-केवायसी पुन्हा सुरू

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले आहे. सरकार आर्थिकदृष्ट्या सक्षम असून निधीत कपात होणार नाही. दुसरीकडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू केल्याची माहिती दिली. पुढील सहा महिन्यांत महिला ई-केवायसी पूर्ण करू शकतील. हप्ता २१०० रुपये करण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे तटकरे म्हणाल्या.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies