एचएसआरपी प्लेटच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

एचएसआरपी प्लेटच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

केंद्र व राज्य शासनाने वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (एचएसआरपी) अनिवार्य केली आहे; मात्र निकृष्ट दर्जामुळे काही महिन्यांतच प्लेटचा रंग उडतोय आणि प्लेट निखळत आहेत. परिवहन विभागाने तीन खासगी कंपन्यांना कंत्राट दिले असून, फिटिंग केंद्रे १५० ते ३०० रुपये अतिरिक्त शुल्क वसूल करत आहेत. प्लेट गहाळ झाल्यास एफआयआर दाखल करून नवीन प्रक्रियेसाठी दोन-तीन हजार खर्च येतो. वाहनधारकांमध्ये मोठी नाराजी आहे.

Source: Pudhari

Read the live feed on ZapIndies