प्लास्टिक नोटांच्या चाचणीला केंद्र सरकारची मंजुरी

प्लास्टिक नोटांच्या चाचणीला केंद्र सरकारची मंजुरी

केंद्र सरकारने ₹10 आणि ₹20 च्या प्लास्टिक (पॉलिमर) नोटांच्या चाचणीसाठी रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येकी 100 कोटी नोटा चलनात आणल्या जाणार असून, भारतीय हवामानात त्यांची कार्यक्षमता तपासली जाईल. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत ही माहिती दिली. प्लास्टिक नोटा अधिक टिकाऊ आणि बनावट रोखण्यास सक्षम असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कागदी नोटा बंद होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies