शिवनाथ आयुर्वेदचा परवाना कायमस्वरूपी रद्द

शिवनाथ आयुर्वेदचा परवाना कायमस्वरूपी रद्द

अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सिन्नर तालुक्यातील शिवनाथ आयुर्वेदिक प्रॉडक्ट कंपनीचा औषध निर्मितीचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला आहे. ही कारवाई भोंदू राजेंद्र गडगेबाबा याच्या दरबारात बोगस औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी करण्यात आली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांच्या तक्रारीनंतर झालेल्या तपासणीत कंपनीने उत्पादन नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचे आढळून आले.

Source: Deshdoot

Read the live feed on ZapIndies