नांदेड जिल्हा बँकेत अशोक चव्हाण यांचे वर्चस्व कायम

नांदेड जिल्हा बँकेत अशोक चव्हाण यांचे वर्चस्व कायम

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या शेतकरी विकास पॅनलने २३ पैकी २१ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. ११ संचालक बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित १२ जागांसाठी झालेल्या मतदानात पॅनलचे १० उमेदवार विजयी ठरले, तर दोन स्वतंत्र उमेदवार निवडून आले. प्रथमच पाच महिला संचालक म्हणून निवडून आल्या आहेत.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies