जस्टिन ग्रीव्हसचा विक्रम, बापू नाडकर्णींचा अभेद्य विश्वविक्रम

जस्टिन ग्रीव्हसचा विक्रम, बापू नाडकर्णींचा अभेद्य विश्वविक्रम

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जस्टिन ग्रीव्हसने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सलग पाच मेडन षटकांत पाच विकेट घेत क्रिकेट इतिहासात आपले नाव कोरले. तो असा पराक्रम करणारा पहिलाच गोलंदाज ठरला. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक २१ मेडन षटके टाकण्याचा विश्वविक्रम आजही भारताचे माजी फिरकीपटू बापू नाडकर्णी यांच्या नावावर कायम आहे. त्यांनी १९६४ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३२ षटकांत फक्त ५ धावा दिल्या होत्या.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies