गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट मंदिरात भाविकांची गर्दी

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट मंदिरात भाविकांची गर्दी

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली. राज्यासह विविध भागांतून हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले. 'अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय' या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला. पहाटे काकड आरतीनंतर पादुकांचे पूजन, अभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies