मानखुर्द-गोवंडी स्वच्छता पाहणी; भिडे यांचे निर्देश

मानखुर्द-गोवंडी स्वच्छता पाहणी; भिडे यांचे निर्देश

मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मानखुर्द व गोवंडी परिसरातील स्वच्छता कामांची पाहणी केली. रेल्वे स्थानकाजवळील घनकचरा चौक्यांना भेट देत कर्मचारी उपस्थिती, यंत्रसामग्री तपासली. दैनंदिन कचरा संकलन दोन सत्रात करण्यासह वाहन फेऱ्या वाढविण्याचे निर्देश दिले. संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासह दंडात्मक कारवाईची सूचना केली. नागरिकांकडून कचरा वर्गीकरणासाठी प्रबोधन करण्याचे आदेश दिले.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies