मध्य रेल्वेने सर्व ७९४ महिला डब्यांमध्ये इमर्जन्सी टॉकबॅक (ETB) प्रणाली कार्यान्वित केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत बटण दाबून प्रवाशी थेट गार्ड किंवा मोटरमनशी संपर्क साधू शकतील. यासोबतच सर्व महिला डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. महिला सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे पाऊल असून प्रवाशांनी त्याचे स्वागत केले आहे.
महिला डब्यांत इमर्जन्सी टॉकबॅक सुरू
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies