पृथ्वीराज चौहाण उपायुक्तपदी बढती, आठ सहायक आयुक्तांची बदली

पृथ्वीराज चौहाण उपायुक्तपदी बढती, आठ सहायक आयुक्तांची बदली

मुंबई महापालिकेत मोठी प्रशासकीय फेरबदल करण्यात आली आहे. मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहाण यांची उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) पदावर बढती झाली आहे. तसेच आठ सहायक आयुक्तांची खांदेपालट करण्यात आली आहे. यामध्ये अलका ससाणे यांना एम पूर्व, उज्ज्वल इंगोले यांना ए विभाग तर स्वप्नजा क्षिरसागर यांच्याकडे करनिर्धारणचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies