दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEET-UG आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी २५ वर्षीय रुचिका सिंग हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील वकील स्मृती सिंह यांनी तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५२, ३५३(१) आणि ३५६(१) अंतर्गत झिरो एफआयआर नोंदवून तपासासाठी दिल्ली पोलिसांकडे वर्ग केले आहे. आरोपी आणि तिचे कुटुंब संपर्काबाहेर असून पोलीस शोध घेत आहेत.
NEET आंदोलनात मोदींविरोधात वक्तव्य; तरुणीविरुद्ध FIR
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies