नव्या ईपीएफ नियमांनुसार नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्याला पीएफच्या एकूण रकमेपैकी फक्त ७५ टक्केच तात्काळ काढता येणार आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम काढण्यासाठी सलग १२ महिने बेरोजगार राहणे बंधनकारक आहे. सरकारने सेवानिवृत्ती बचत सुरक्षित ठेवण्यासाठी हा नियम केला आहे. जुन्या नियमात दोन महिन्यांनंतर पूर्ण रक्कम काढता येत होती.
नोकरी सोडल्यानंतर पीएफमधून ७५ टक्केच काढता येणार
Source: TV9 Marathi
Read the live feed on ZapIndies