अहिल्यानगरमध्ये रविवारी झालेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 107 व्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी व विरोधी गटातील महिला शिक्षिका एकमेकींना भिडल्या. 'चिमूटभर महिला' या शब्दावरून सुरू झालेल्या गोंधळात माईक, वायर आणि स्टील डेक्सची ओढाताण झाली. विरोधी नेत्या स्वाती गोरे यांनी व्यासपिठावर धाव घेतली. अखेर संतोष दुसुंगे यांनी माफी मागून शेड्यूल बँकेचा विषय स्थगित केला आणि गोरे यांच्यावर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला.
शिक्षक बँकेच्या सभेत महिला शिक्षिकांची झुंज
Source: Deshdoot
Read the live feed on ZapIndies