चांदा येथे बनावट दारूच्या कारखान्यावर छापा, ११.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा येथे बनावट दारूच्या कारखान्यावर छापा, ११.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने नेवासा तालुक्यातील चांदा येथील बनावट दारू कारखान्यावर छापा टाकून ४ लाख १६ हजार ९३५ रुपयांची बनावट दारूसह एकूण ११ लाख ७२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. विदेशी कंपन्यांच्या नावाने बनावट दारू बनवून हॉटेलमध्ये विक्री केली जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी फरार आहेत.

Source: Deshdoot

Read the live feed on ZapIndies