औषध प्रशासन विभाग आणि संगमनेर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोगलपुरा परिसरातील कॉस्मेटिक दुकानातून पाकिस्तानात उत्पादित प्रतिबंधित सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला. 'गोरी ब्युटी क्रीम'सह १२ हजार १०० रुपये किमतीची उत्पादने जप्त करण्यात आली असून दुकानदार शाहिद रियाज शेखविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रीमचे नमुने रासायनिक परीक्षणासाठी पाठविण्यात आले असून पुरवठादार आणि विक्रीच्या मार्गांचा सखोल तपास सुरू आहे.
संगमनेरात प्रतिबंधित पाकिस्तानी क्रीमचा साठा जप्त
Source: Deshdoot
Read the live feed on ZapIndies