विदर्भातील संत्रा व मोसंबी बागांना हवामान बदलाचा मोठा फटका बसला आहे. उन्हाळ्यातील विक्रमी तापमान, जूनअखेरपर्यंत पावसाचा दीर्घ खंड आणि जुलैमधील मुसळधार पावसामुळे फायटोप्थोरासह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून आंबिया बहरातील फळगळ सुरू झाली आहे. राज्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड असून त्यापैकी एक लाख हेक्टर अमरावती जिल्ह्यात आहे. ऑगस्टअखेरपासून तोडणीला सुरुवात होणार असली तरी उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
हवामान बदलाने विदर्भातील संत्रा-मोसंबी बागांवर संकट
Source: Agrowon
Read the live feed on ZapIndies