केंद्रीय अर्थमंत्रालयाने ईपीएफओतंर्गत वेतनमर्यादा १५,००० रुपयांवरून २५,००० रुपये करण्यास मंजुरी दिली आहे. सुरुवातीला ३०,००० रुपयांचा प्रस्ताव होता, मात्र अंतिम निर्णय २५,००० रुपयांवर झाला. यामुळे अधिक कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी कॅबिनेटकडे जाणार असून, तो १ एप्रिल २०२७ पासून लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईपीएफओने ९० टक्के पीएफ क्लेम ४८ तासांत ऑटो-सेटल होत असल्याचा दावा केला आहे.
EPFO वेतनमर्यादा १५ ते २५ हजार रुपयांवर; प्रस्ताव कॅबिनेटकडे
Source: TV9 Marathi
Read the live feed on ZapIndies