अनिल देशमुखांवर खटला चालवण्यास ईडीला राज्यपालांची मंजुरी

अनिल देशमुखांवर खटला चालवण्यास ईडीला राज्यपालांची मंजुरी

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात खटला चालवण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. ईडीने ही मंजुरी २१ मे रोजी मिळाल्याचे मुंबईतील विशेष न्यायालयाला कळवले. बार आणि रेस्टॉरंटमधून कथित खंडणी वसुलीशी संबंधित PMLA प्रकरणात पुढील कारवाईचा मार्ग मोकळा झाला असून, ईडीचे विशेष सरकारी वकील सुनील गोन्साल्विस यांनी न्यायालयात पत्र सादर केले.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies