नाशिकमध्ये डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव; दोन दिवसांत ७ नवे रुग्ण

नाशिकमध्ये डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव; दोन दिवसांत ७ नवे रुग्ण

नाशिक शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत असून अवघ्या दोन दिवसांत सात नवे रुग्ण आढळले आहेत. जुलैमध्ये ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने विशेष सर्वेक्षण मोहीम सुरू केली असून आरोग्यसेवक घराघरांत जाऊन तपासणी करणार आहेत. नागरिकांना डासांपासून बचावासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies