एअर इंडियाच्या विमानाला तीव्र टर्ब्युलन्स; १२ प्रवासी जखमी

एअर इंडियाच्या विमानाला तीव्र टर्ब्युलन्स; १२ प्रवासी जखमी

फुकेतहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या AI2379 विमानाला मंगळवारी हवेत तीव्र टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. अचानक झालेल्या धक्क्यांमुळे १२ प्रवासी आणि ४ क्रू सदस्य जखमी झाले. विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. जखमींना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. एअर इंडियाने सर्व प्रवासी व क्रू सुखरूप असल्याचे सांगत तपासात सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies