मुंब्र्यात बिनविरोध परंपरा खंडित; दिपाली भगत विजयी

मुंब्र्यात बिनविरोध परंपरा खंडित; दिपाली भगत विजयी

ठाणे महापालिकेच्या ९ प्रभाग समित्यांपैकी ८ ठिकाणी अध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली, तर मुंब्रा प्रभाग समितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) दिपाली भगत यांनी एमआयएमचे अन्सारी नफीस अहमद यांचा पराभव करत विजय मिळवला. भगत यांना १० मते मिळाली, तर अहमद यांना ४ मते. यामुळे मुंब्र्यातील बिनविरोध निवडीची परंपरा खंडित झाली. ही निवडणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies