मुंबईत कोविड, एच१एन१सह साथीच्या आजारांच्या रुग्णांत वाढ

मुंबईत कोविड, एच१एन१सह साथीच्या आजारांच्या रुग्णांत वाढ

मुंबईत पावसाळ्यानिमित्त साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले असून मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस आणि गॅस्ट्रोबरोबरच कोविड आणि एच१एन१च्या रुग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. जुलैमध्ये मलेरियाचे १,३८०, डेंग्यूचे ४६६, लेप्टोस्पायरोसिसचे ७८ आणि गॅस्ट्रोचे ८५१ रुग्ण आढळले. कोविडचे रुग्ण २७ वरून ५८, तर एच१एन१चे ५८ वरून १०५ झाले आहेत. महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies