दिलीप कुमार संग्रहालयाची जागा विक्रीस; सायरा बानो यांचा पुढाकार

दिलीप कुमार संग्रहालयाची जागा विक्रीस; सायरा बानो यांचा पुढाकार

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी दिवंगत पती दिलीप कुमार यांच्या वांद्रे येथील पाली हिल बंगल्यातील संग्रहालयासाठी राखीव जागा विकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आशर ग्रुपने २०२३ मध्ये या जागेवर संग्रहालय उभारण्याची घोषणा केली होती. पुनर्विकासानंतर उभारलेल्या 'द लिजेंड बाय आशर' इमारतीतील १,६९६ चौरस फूट व्यावसायिक जागा विकली जात असून, त्यातून मिळणाऱ्या रकमेचा वापर सायरा बानो यांना देय असलेल्या ३५० कोटी रुपयांच्या परतफेडीसाठी होण्याची शक्यता आहे.

Source: Pudhari

Read the live feed on ZapIndies