अहिल्यानगरमध्ये साड्या पाहण्याचा बहाणा करत मैत्रिणीच्या घरातून 14 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख चोरीला गेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी प्रीती बोठे यांच्या घरातून ही चोरी केल्याप्रकरणी स्नेहल ज्ञानदेव बेंदे हिच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघी 2022 ते 2025 या काळात न्यू लॉ कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेत होत्या. पोलीस तपास करत आहेत.
साड्या पाहण्याच्या बहाण्याने मैत्रिणीच्या घरातून 14 तोळ्यांचे दागिने लंपास
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies