कांजुरमार्ग कारशेड वाद कायम, मेट्रो-६ चे ८८ टक्के काम पूर्ण

कांजुरमार्ग कारशेड वाद कायम, मेट्रो-६ चे ८८ टक्के काम पूर्ण

मुंबईच्या स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६ मार्गिकेचे सुमारे ८८ टक्के काम पूर्ण झाले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा जमीन वाद कायम आहे. केंद्राच्या मिठागर विभागाने जमीन हस्तांतरणाला न्यायालयात आव्हान दिल्याने कारशेडचे काम रखडले आहे. एमएमआरडीएने पुणे मेट्रोच्या धर्तीवर व्हायाडक्टवर सुविधा उभारण्याचा पर्यायी कार्यक्रम आखत २०२७ पर्यंत मार्गिका सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies