नागपूरमधील मेयो आणि मेडिकल रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी आजपासून संप पुकारला आहे. बीएचएमएस डॉक्टरांच्या नोंदणी प्रस्तावाला विरोध करत सेंट्रल मार्डने राज्यव्यापी नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातील 1500 हून अधिक डॉक्टर सहभागी असून, अत्यावश्यक सर्जरी वगळता इतर शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. आपत्कालीन सेवा आणि अपघात विभाग सुरू राहणार आहेत.
नागपूरमध्ये निवासी डॉक्टरांचा संप, 1500 डॉक्टर सहभागी
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies