पुण्यात शेतकऱ्यांचा मोबदला न दिल्याने आयुक्तांची खुर्ची जप्त होणार?

पुण्यात शेतकऱ्यांचा मोबदला न दिल्याने आयुक्तांची खुर्ची जप्त होणार?

पुणे महापालिकेने देवाची उरुळी व फुरसुंगी परिसरातील शेतकऱ्यांची जमीन कचरा डेपोसाठी घेतली, पण २१ वर्षे मोबदला दिला नाही. न्यायालयाच्या आदेशानंतरही पैसे न दिल्याने लघुवाद न्यायालयाने आयुक्तांची खुर्ची, लॅपटॉप जप्त करण्याचे आदेश दिले. ऐनवेळी प्रतिज्ञापत्र देऊन ११ ऑगस्टपर्यंत पैसे देण्याचे आश्वासन दिल्याने खुर्ची वाचली; आता विधी सल्लागार आणि भूसंपादन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies