महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ अधिकृत राजपत्रात प्रकाशित होऊन राज्यभरात लागू झाला आहे. या कायद्यान्वये बळजबरी, फसवणूक, आर्थिक प्रलोभने किंवा खोट्या आश्वासनांनी केलेल्या धर्मांतराला बंदी घालण्यात आली आहे. विरोधी पक्षांनी हा कायदा वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो केवळ फसवणूक रोखण्यासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. कायद्याच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेवरच त्याचे यश अवलंबून आहे.
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा अमलात
Source: Deshdoot
Read the live feed on ZapIndies