नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणात बुधवारी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस वाहतूक आणि नियोजनासंदर्भात आढावा बैठक झाली. यामध्ये प्रमुख धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या मार्गांवरील बससेवा, विमानतळ-रेल्वे स्थानकांदरम्यान संपर्क व्यवस्था, शटल बसमधील माहितीपर व्हिडिओ आणि पार्किंग व्यवस्थापनावर चर्चा झाली. १५ दिवसांनंतर पुन्हा आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी बस वाहतूक नियोजनाचा आढावा
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies