‘गुंगी गुडिया’ वादात नाशिकमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आमनेसामने

‘गुंगी गुडिया’ वादात नाशिकमध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आमनेसामने

महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केल्याने राजकारण तापले आहे. बुधवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नाशिकमध्ये काँग्रेसविरोधात आंदोलन करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले. जिल्हाधिकारी कार्यालयापासून काँग्रेस कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला; दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून बंदोबस्त केला.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies