महाराष्ट्रातील बहुतांश भागांत पावसाचा जोर कमी होत असून, पुढील दोन महिन्यांत अल निनोचा प्रभाव तीव्र होण्याची शक्यता आहे. मात्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे. रायगड आणि पुणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, कोल्हापूर, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार; घाटमाथ्यावर अलर्ट
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies