जनआरोग्य योजनेतील संशयास्पद दाव्यांच्या चौकशीसाठी एसआयटी

जनआरोग्य योजनेतील संशयास्पद दाव्यांच्या चौकशीसाठी एसआयटी

महाराष्ट्र सरकारने आयुष्मान भारत-पंतप्रधान जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत २०२४-२६ या कालावधीतील १५,४०७ संशयास्पद उपचार दाव्यांच्या चौकशीसाठी विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमले आहे. नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखालील या पथकाला ३० दिवसांत अहवाल सादर करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत भाजप आमदार राहुल आहेर यांनी नाशिकमधील गैरव्यवहाराची माहिती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Source: Deshdoot

Read the live feed on ZapIndies